या वर्षी खूपच कमी पाऊस पडला त्यामुळे जमिनीतील पाण्याच्या साठ्यावर खूपच परिणाम झाला पुढे येणाऱ्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लोकसहभागातून जलसंधारणाची चळवळ सुरु केली आणि प्रत्येक ग्रामपंचायतीत याचा प्रसार केला
दिनांक ५ ऑक्टोबर २ ० २ ६ रोजी नाडण ग्रामपंचायतीत ग्रामसेवक श्री धुमाळ आणि तात्पुरत्या नेमलेल्या प्रशासक श्रीमती सुनीता धुरे व माजी सरपंच संतोष कानडे यांच्या उपस्थितीत ग्रामसभा झाली , सभेमध्ये येऊ घालणाऱ्या दुष्काळावर काय योजना आहेत याची सविस्तर माहिती श्री धुमाळ यांनी दिली यावर ग्रामस्थांमध्ये चर्चा झाली .आणि लोकसहकारातून " वनराई बंधारा घालण्याचे ग्रामस्थांनी एकमताने मान्य केले ग्रामसेवक श्री धुमाळ यांनी JCB आणि माती भरण्यासाठी पोती उपलब्ध करू शकतो असे सांगितल्यावर वहाळात बावीस बंधारे घालावयाचे एकमताने ठरले. ग्रामपंचायतीचा कर्मचारी श्री अमित कांबळी याचेही सहकार्य लाभले , ग्रामस्थांना हवी असलेली माहिती पुरवल्या मुळे ग्रामस्थ त्याच्या कामावर खुश , माजी उपसरपंच श्री एकनाथ पुजारे यांनीही काही मुद्दे सुचवले ,एकूणच ग्रामसभा येऊ घातलेल्या दुष्काळावर मात करण्यास सज्ज झाली . असे म्हटले तरी हरकत नाही .
छायाचित्रे - अमित कांबळी , नाडण