This website uses cookies to ensure you get the best experience on our website.
power@amhishetkari.com
Nadan Velankar Vadi Devgad Sindshudurg 416805
गावाकडच्या गोष्टी
Home  ∣  योजना आणि गाव   ∣   गावाकडच्या गोष्टी

पाणी आडवा - पाणी जिरवा 

नाडण ग्रामपंचायत - उल्लेखनीय कामगिरी 

पाणी आडवा पाणी जिरवा या तत्वानुसार - वहाळाचे खोद  काम करून ( वहाळातील साचलेली माती आणि गाळ उसपून ) या थोड्याश्या पडलेल्या पावसाने वहाळात लक्षणीय पाणी साचून थोड्याश्या पडलेल्या पावसाने आजूबाजूच्या विहिरी पाण्याने भरल्या  . आज कैक दिवस पावसाने सुट्टी घेतल्यामुळे पाण्यासाठी अतोनात ग्रामस्थांचे हाल झाले असते . पण नाडण  ग्रामपंचायतीचे सरपंच श्री संतोष कानडे यांनी घेतलेल्या परिश्रमांमुळे आणि या कामाचा सतत पाठपुरवठा केल्याने त्यांचा हा प्रयोग पूर्णपणे यशस्वी झाला असे  म्हणावयास हरकत नाही . पूर्वी बांधलेल्या बंधाऱ्याचा उपयोग अश्या  कल्पकतेने यशस्वी करता येतो हे त्यांनी दाखवून  दिले.  तसेच गावातील इतर ठिकाणीही हाच प्रयोग करून गावातील पाण्याचा प्रश्न सोडवावा . ग्रामस्थांची अशीच साथ त्यांना मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !
WhatsApp Image 2026-06-21 at 7.05.34 AM

तसेच नाडण  मोंड रस्त्यावरच्या दोन्ही मोर्यांचे काम खूपच उत्तम झाले , काम चांगले करावयाचे असले तर ते अश्या पद्धतीत उत्तम प्रकारे करता येते याचा नाडण ग्रामपंचायत सरपंच श्री संतोष कानडे यांनी एक आदर्श घालून दिला , त्याबद्दल त्यांचे कौतुकच आहे .